Wednesday, 30 January 2013

Appraisal




“Appraisal”  हा शब्द  आपल्या सारख्या  रोज तास  MNC मध्ये राबणाऱ्या लोकांसाठी काही नवीन नाही, आणि या विषयावर लेख लिहण्याच कारण कि……..आताचे   हे महिने appraisal या गोष्टी भोवती सारखे गोल गोल फिरणार आणि मी सुद्धा अश्याच एका MNC मधल्या  appraisal च्या कचाट्यात अडकून पडलोय.

January ते March हे महिने नुसत Ratings, feedback, appreciation mail  etc असे शब्द कानावर पडतात  कारण हेच ते महिने ज्यासाठी लोक वर्षभर काम करतात……. हि एकच आशा ठेवून कि या वर्षी तरी माझ appraisal चांगल होईल.
आपण वर्षभर या महिन्यासाठीच  काम करतो आणि Manager वर्षभर काम करता या महिन्यात सगळी काम करतो.
                                                              हे आमच तस  appraisal  पहिलच  वर्ष असल्याने आमची उत्सुकता पराकोटीला पोहचली होती.....एवढ असत तरी काय हे appraisal…..आणि आमचे सहकारी कर्मचारी  एवढे काय घाबरून असतात या appraisal process ला, याची उत्कंठा आम्हला पण लागून राहिली होती आणि म्हणता म्हणता appraisal form आला आणि आम्ही वर्षभर काय काय दिवे लावले हे सगळ आम्ही त्या form मध्ये भरलं.......आणि एवढ्या confidence ने कि  " काय झंडू लोक आहेत appraisal ला घाबरतात आपल तर बाबा sure-shot चांगल्या ratings भेटणार.................आणि promotion तर आपल्यालाच  आणखी दुसर आहेच कोण "

पण जेंव्हा ratings आल्या तेंव्हा पायाखालची जमीनच सरकली.....एवढी कमी rating आणि No promotion आणि ठरवलं….. "आयच्या गावात आणि बाराच्या भावात Feedback च्या वेळी वाटच लावतो manager ची......च्यायला मला एवढ्या कमी ratings, होऊच शकत नाही "

आणि अस म्हणता म्हणता Feedback चा पण दिवस आला आणि "फुल टु वाट लावायची" याच attitude ने आत शिरलो पूर्ण तयारी करून ठेवली होती मी.....हे बोलायचं.....ते बोलायचं.... मी हे काम केल.....ते काम केल पण जेंव्हा आत शिरलो   आणि जे काही manager ने बोलायला सुरवात केली………तेंव्हा अस वाटल च्यायला वर्षभर मी काय गोट्या खेळल्या कि काय ? तेंव्हा मला समजल  की  माझे सहकारी कर्मचारी का  घाबरतात या appraisal process ला……आणि आता त्याच्या group मध्ये एका नवीन member   आगमन झाल होत.

आणि दरवर्षी प्रमाणे यंदाच्या सुद्धा वर्षी आमचा Manager  बरेच मोठे मोठे शब्द वापरून आम्हाला आमची rating एवढी कमी का…….आणि यात तुमची किती चूक आहे………. हे पण दाखवून देण्यात पूर्ण प्रमाणे यशस्वी झाला आणि आम्ही सुद्धा आमचीच काहीतरी चूक झाली असणार अस समजून  याच  आशेने कामाला लागलो  कि  "चला  यावर्षी नाही पण पुढच्या वर्षी तरी मला चांगली rating भेटून माझ promotion होईल"



आमच्या सहकारी कर्मचार्यांच्या बोलण्या वरून आम्हाला हे कळाल कि यावर्षी सुद्धा आमचा manager आम्हाला Proactiveness , Self Initiative , Work Around timings , Organization Process अश्या भल्या मोठ्या शब्दांच्या जाळ्यात गुंडाळण्यात १०० % यशस्वी झाला आणि आता वर्षभर तरी यांची काही कट-कट  नाही या खुशीने आपल्या कामाला पण लागला.



Monday, 12 November 2012

दानाचे महत्व




                  कालच पेपर वाचताना पहिल्या पानावर शिर्डीच्या साई बाबंचा मोठा फोटो पहिला...म्हंटल वाह आज सकाळ सकाळी....देवाच दर्शन झाल आज दिवस चांगला जाणार.....पण खालची बातमी वाचली आणि मला धक्काच बसला.......कोणी एका अनोळखी इसमाने शिर्डीच्या साई बाबांना ९० लाखांची दोन सोन्याची ताट भेट केली....ते पण दान म्हणून.....आणि आता त्याच ताटातून बाबांना प्रसाद भेट चढवणार आहेत.......वाह काय चांगली बातमी असल्या सारख पेपर वाल्यांनी हि बातमी मोठी करून पहिल्या पानावर छापली.....

आता मला सांगा शिर्डीच्या साई बाबांनी अख्ख आयुष्य फकिरा सारख काढाल....आणि आपला सगळा वेळ गोर-गरिबांच्या मदतीसाठी दिला....त्या शिर्डीच्या साई बाबांना तुम्ही सोन्याच्या ताटात प्रसाद अर्पण करून तुम्ही त्यांचा अपमान नाही का करत.......?
आणि मला नवल याच वाटत....त्या इसमाच……..९० लाख तू बाबांना भेट म्हणून देतोस....अरे त्यापेक्षा कुठल्या गरिबांना मदत केली असतीस तर त्यांच्या आयुष्याच सोन झाल असत.......बाबा तर श्रद्धेचे भुकेले आहेत....ते काय करणार सोन्याच्या ताटाच ? पण नाही……
लोकांना अजून दानाच महत्व कळल नाहीये.....मी इथे काय कुणाला दान काय कराव हे सांगायला बसलो नाही......पण माणसाने दान काय कराव हे तरी कळायला हव ना......
त्याच सोन्याच्या ताटापेक्षा जर त्या इसमाने कुठल्या अनाथ आश्रमाच्या लहान मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलला असता.......
किंवा एखाद्या OLDAgeHome ला दान केल असत तर......किती पुण्य मिळाला असत त्या लोकांच.......पण लोक असा विचार कधीच करत नाही..........दान हे कुठल्याही फळाची अपेक्षा करत करायचं असत.........लोक दान करतात ते स्वार्थापोटी........ “ देवा आता मी तुला १० तोळ सोन चढवतो आहे पुढच्या वर्षी माझ्याकडे २० तोळ सोन येऊ दे “ काय आहे हे.......
देवाला सोन्या-चांदीची अपेक्षा नाही....तो फक्त भक्ताच्या भक्तीसाठी भुकेला असतो......देव कधी सोन आणि चांदी देऊन खुश नसतो होत....तो आपल्या भक्ती वर खुश होतो....पण लोक ह्याचा विचार कधी करत नाही.......लोक फक्त आपला फायदा पाहत असतात......फक्त आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत असतात

म्हणून कधीही देवाला दान देण्यापेक्षा एखाद्या संस्थेला दान दान करा.....तुमच्या मिळालेल्या त्या पैश्यामुळे गोर गरिबांची मदत होईल......बाबांनी आपल उभ आयुष्य गोर-गरिबांची मदत करण्यात घालवाल.....आपण सुद्धा बाबांनी सुरु केलेल्या कार्याला थोडा हाथभार लावू.......आणि बाबांना पण तेच हव आहे

Saturday, 3 November 2012

शेवटची भेट

शेवटची भेट

आजचा दिवस खूप लवकर जातोय अस वाटत होत.......सकाळपासून मन नुसत बेचैन झाल  होत....ऑफिस मध्ये कामात पण लक्ष लागत नव्हत
आजची  संध्याकाळ होऊच नये अस वाटत होत.......पण वेळ कोणासाठी थांबली आहे का ? बघता बघता वाजले आणि मी ऑफिस मधुन निघालो
तिने नेहमी प्रमाणे मला जुहू बीचला भेटायला बोलावलं......ती वाजता येणार होती, म्हणून मी १५  मिनिटे आधीच आलो होतो खूप साऱ्या प्रश्नाची उत्तर हवी होती मला तिच्याकडून.........
संध्याकाळची वेळ असल्यामुळे पाणीपुरीवाला,भेळवालाच्या stall  वर  खूप गोंगाट आणि रहदारी होती.......म्हणून मी पुढे जाऊन एका ठिकाणी बसलो....समोर अथांग समुद्र पसरला होता आणि क्षितीज्या जवळ सूर्य मावळता होता...........जणू तो काही आज आमच्या भेटीच्या साक्षीसाठी थांबला होता.......
इतक्यात ती समोरून येताना दिसली.......आज माझ्या आवडीचा सफेद रंगाचा सलवार कमीज घातला होता.......खूप सुंदर दिसत होती आणि मावळत्या सूर्याच्या त्या गुलाबी प्रकशात तीच  ते सुंदर रूप अजूनच खुलून दिसत होत.....पण आज रोजच्या सारख हसू तिच्या चेहऱ्यावर नव्हत.....खूप शांत दिसत होती ती........आणि त्याला कारण पण तसच होत,
ती माझ्या पासून थोड्या अंतरावर बसली....... आम्ही दोघेपण शांत बसलो होतो.........कोणीही  बोलायच्या  मनस्थितीतच नव्हत........मी समोरच्या  मावळत्या सूर्याच्या क्षितीजाकाडे नजरा लावून बसलो होतो..........अस वाटत होत वेळेच चक्र थांबल कि काय..........आणि माझ्या डोळ्यासमोर ती घटना पुन्हा आठवली.

दिवस आगोदर

मीका रुतुसोड सगळ आपण परस्पर लग्न करू.....मी सगळ manage  करतो...तू काही tension  नको घेऊ.
रुतु : नाही विशू.....मला नाही जमणार...मी माझ्या आई वडिलांच्या विरोधात नाही जाऊ शकत....मी त्यांना समजावेन
मी : पण किती दिवस.....दोन महिने झाले रोज तेच चालू आहे आपल...तुझ्या घराचे ऐकणार नाहीत...मला माहिती आहे
रुतु : पण मी अजून प्रयत्न करतेय...
 मी : अजून हे किती दिवस चालणार रुतु.....ते आपल्या लग्नाला कधीच परवानगी देणार नाहीत...हे मला माहिती आहे आणि तुला पण....तरीही हा अट्टाहास का ?
तुझ माझ्यवर प्रेम आहे ना....बस मला एवढ पुरेस आहे...आपण नव्याने आपल आयुष्य सुरु करू....तू फक्त हो म्हण
रुतु : नाही विशू....मी नाही सोडू शकत माझ्या आई-वडिलांना....मला ते हवे आहेत.....
मी :  मग मी नाही हवा ?
रुतु : मला तुम्ही दोघ हवे आहात....मी काय करू ? 
मी : हे बघ तुला काय तो निर्णय घ्यावाच लागेल....एकतर मी किंवा तुझे आई-वडील ? मी सगळा निर्णय तुझ्यावर सोडलाय (आणि मी निघून गेलो....)

चार दिवस आम्ही एकमेकांना ना फोन केला ना SMS.......सहाव्या दिवशी तिनेच फोन केला

रुतु : हेलो विशू...मी बोलतेय
मी    : हो बोल....काय काम आहे..
(दहा मिनिटे ती बोललीच नाही )
मी : रुतु तू आहेस ना....
रुतु   :  हो....आहे ( तिचा आवाज जड वाटत होता )
मी : काय झाल ?
रुतु : मी माझ्या आई-वडिलांना नाही सोडू शकत....विशु...तूच सांग मी काय करू....आपणाला वेगळ व्हावच लागेल...माझ्याकडे काहीच पर्याय नाही....आणि  ती रडायला लागली
मला काय बोलाव हेच कळेना....मला हे उत्तर अपेक्षितच नव्हत....
रुतु : तू मला उद्या संध्याकाळी  वाजता भेट
आणि तिने फोन ठेवला.......

विशु...विशु....तिच्या आवजाने मी भानावर आलो....
विशु खूप उशीर होतोय........मला निघायला हव.....इतक्यात तिने तिच्या पर्स मध्ये हाथ घातला आणि मी दिलेली सर्व ग्रीटींग्स  आणि लेटर मला दिली

मी : का रुतु ? तुला आता मी नकोसा झालोय
रुतु : नाही विशु....मी तुझ्याशिवाय कोणावरही प्रेम केल नाही....पण काही प्रश्न असे  असतात ज्यांची  उत्तर सापडलेलीच बरी..... Please  विशु आता मला काहीच विचारू नको.....please 

मी हि त्यावर काही बोललो नाही.....आम्ही दोघ पण तसेच शांत बसलो होतो.....सूर्य क्षितिजावरून खाली जात होता...जणू काही तो हि हेच सांगत होता....आता वेळ संपत आली आहे
ती अचानक उठली आणि मला म्हणाली  
विशु............( तिचे डोळे लाल झाले होते.....तिला शब्द जड झाले होते )...मी........मी आता तुला कधीच भेटणार नाही

तिने माझा हाथ तिच्या हाथात घेतला.....आणि म्हणाली....विशु मला विसरण्याचा प्रयत्न कर.........माझ्या सगळया आठवणी विसरून जा....माझ्यासाठी तुझ आयुष्य खराब करू नकोस ...... खूप मोठा हो.........मी आता तुला कधीच भेटणार नाही.....हि आपली शेवटची भेट........आणि ती मला तिथेच सोडून निघून गेली आणि मी तसाच तिच्या पाठमोऱ्या छबी कडे पाहत राहिलो........शेवटपर्यंत.........