Saturday 29 September 2012

साजणी




साजणी नभात नभ दाटून आले,
कावरे मन हे झाले तू ये ना साजणी......
साजणी छळतो मझ हा मृद्गंध ,
तुझ्या स्पर्शास मी धुंद तू ये ना साजणी......

ह्या वरच्या चार ओळी वाचल्यावर प्रत्येकाच्या मनात तिची आठवण आली नसेल अस होणारच नाही....आणी  ती कोण हे मला सांगायची गरज नाही
प्रत्येकाच्या मनात ती आहे....आणि प्रत्येकासाठी ती खूप प्रिय आहे.....
तिच्या बद्दल जेवढ कौतुक कराव तेवढ कमीच आहे.....
ती कधी माझ्या डोळ्यासमोरून ओझळ होऊ नये अस मला नेहमी वाटत...
तिची आठवण जरी झाली ना......तरी माझ्या चेहऱ्यावर एक हास्य उमलत......हो आहेच ती एवढी स्तुती करण्या सारखी......
फक्त तिच्यासाठी कवी व्हावस वाटत.......आणी माझ्या सगळ्या कविता फक्त तिच्यासाठी कराव्याश्या वाटतात.....
ती नेहमीच खूप सुंदर दिसायची...ती नेहमीच खूप गोड हसायची....तीच ते अप्रतिम सौंदर्य मला नेहमीच भुरळ घालायचं......
हो माझ्यासाठी जगात फक्त ती एकटीच सुंदर आहे.....आणी माझ्या मनात फक्त तिचीच एक सुंदर छबी आहे....
मला कधी भेटायला उशीर झाला कि तिचा तो नेहमीचा खोटा खोटा राग....मी कधी दुसऱ्या मुलीची तारीफ केली कि तिचा फुसका धाक.........मी कधीच विसरू शकत नाही....
मी कधी ओरडलो तर तिचे ते पाणावलेले डोळे....माझ्या मनाला नेहमी हुरहूर लावायचे...
खूप हळवी होती ती.....माझ्यावर खूप प्रेम करायची....
तीच मी आजारी असलो कि नेहमी काळजी करण......”तुला सांगितलं होत ना बाहेरच काही खात जाऊ नको बघ पडलास ना आता आजारी” म्हणून मला ओरडण........अन रात्री "काळजी घे" म्हणून पाठवलेला तिचा तो एक sms तिच्या मनातल बराच काही सांगून जायचा.....

तिला ना chocolate  खूप आवडायचं आणी ती नेहमी chocolate चा हट्ट करायची......मला माहिती होत, तरी  पण मी  मुद्दाम रागावायचो कारण त्या नंतरच तीच ते मला  मनावन मला नेहमीच  हव-हवस वाटायचं.........
ती नेहमी म्हणायची....एवढ्या कविता करतोस.....कधी माझ्यावर पण एक कविता कर ना....पण माझ्या तर सगळ्या कविता ह्या फक्त तिच्या साठीच असायच्या.....हे कधी तिला सांगू शकलो नाही....
मी तिच्यावर कितीही रागवायचा प्रयत्न केला तरीही तीच एक हास्य मला माझा सगळा राग विसरायला लावायचं....म्हणून मी कधी तिच्यावर रागावू शकलो नाही........हो फक्त तीच एक हास्य......तुम्हला मी वेडा तर वाटत नाही ना......पण खर सांगू हो आहेच मी वेडा.........पण फक्त तिच्या प्रेमात वेडा.....
तिची आठवण आली ना कि माझ्या मनात तिच्या सगळ्या आठवणीची एकच गर्दळ होते......
तिच्या बद्दल मी कितीही सांगितलं तरीही ते माझ्यासाठी अपूरच आहे....... कारण माझ्या जगात फक्त ती आहे......आणि सगळीकडे फक्त ती आणी तीच....

माझ्या स्वप्नात ती,
माझ्या मनात ती,
माझ्या आयुष्यातला एक पर्व ती......
जगासाठी निराधार मी...पण माझ्या आयुष्याचा आधार ती......

ती दुसरी तिसरी कोणी नसून माझ्या मनातली साजणी आहे.......................



Tuesday 25 September 2012

प्रेमाची जात ( एक काल्पनिक कथा )




हो तुम्हाला हि प्रश्न पडला असेल ना प्रेमाला कधी जात  असते का.........? पण  मला कळल आहे.......कि प्रेमाला पण जात असते
बऱ्याच वर्षा पूर्वी मी कॉलेजला असताना अनुजा माझ्या जीवनात आली........... तीच ते सुन्दर  रूप आणि तिचे ते बोलके डोळे मला नेहमीच तिच्या जवळ जायला आकर्षित करायचे.........
                  
कॉलेज मध्ये असताना सगळ्यांचा गणित हा अवघड  विषय पण आमची त्यात महारथ त्यामुळे अनुजा ने मला तिला गणित शिकवायची request  केली होती.....आणि नाही म्हणायचा प्रश्न तर येतच नव्हता कारण मला पण , तिच्या अजून जवळ येण्याचा chance  हवा होता.....गणिताच्या शिकवणीच्या बहाण्याने मी तिच्या  घरी येऊ जाऊ लागलो....तिच्या घराचे पण आता  चांगले ओळखायला लागले होते......गणिताची सूत्र जुळवता जुळवता आमच्या प्रेमाची सूत्र कधी जुळली हे आम्हाला कळलच नाही
आंम्ही लग्न करायचं ठरवलं.......तिच्या घराचे पण मला चांगले ओळखत होते......त्यामुळे आम्हाला कधी प्रोब्लेम येईल अस आम्हाला कधीच वाटल नाही......आणि बघता  बघता तिच्या प्रेमात वर्ष  कशी निघून गेली कळलच नाही......आम्ही college  pass -out  झालो.......मला नोकरी लागली कि,  "मी तिच्या घरी तिचा हाथ मागायचा"  अस आमच ठरलं होत........
आणि तो दिवस आला............. मला एक चांगली नोकरी लागली......मला माझ्या नोकरी पेक्षा आता अनुजा कायमची माझ्या जीवनात येणार याचा आनंद  जास्त होता.....अनुजा पण खूप खुश होती कारण मी तिच्या घरी लग्नाची बोलणी करायला येणार होतो म्हणून.....

त्याच दिवशी संध्याकाळी मी तिच्या घरी पेढ्यांचा box  घेऊन गेलो......
तिचे आई बाबा घरीच होते..... आधी मी त्यांना नोकरी लागल्याच सांगितलं आणि ते खूप खुश झाले आणि खूप मोठा हो हा आशीर्वाद पण त्यांनी  दिला......
पण मी तर अजून खरी गोष्ट सांगितलीच नव्हती.....कस सांगू ?  ह्या एका प्रश्नाने माझ्या डोक्यात नुसत थैमान घातलं होत......तिकडून अनुजा सांग ना म्हणून खुणवत होती......पण माझा सगळा गोंधळ उडाला होता
पण हिंम्मत करून मी त्यांना “अनुजा मला आवडते आणि मला तिच्याशी लग्न करायचं हे” एका दमात सांगून टाकल 
आणि हे वाक्य ऐकल्यावर त्या खोलीत एकच     शांतता पसरली.....सगळे चूप......अनुजा चे बाबा उठले आणि म्हणाले नाही हे शक्य नाही......मी म्हणालो का काही कमी आहे का माझ्यात ?........चांगली नोकरी आहे.......स्वताच घर पण आहे......अजून काय हव लग्न करण्यासाठी.....?
ह्या प्रश्न वर त्यांनी दिलेलं उत्तर ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली....

"काय आहे तुझी जात ?"
   आम्ही ब्राम्हण आणि तू खालच्या जातीतला आमचा आणि तुझा मेळ काय.....  
तू कितीही पगार घेतलास , बंगला बांधलास,  तरी तू तुझी जात नाही बदलू शकत........मला त्यांच्याकडून हे उत्तर कधीच अपेक्षित नव्हत.....
त्या रात्री मी आणि अनुजा त्यांना किती समजावण्याचा प्रयत्न करत होतो पण आमचे सगळे प्रयत्न व्यर्थ.....याच बाचा बाची मध्ये अनुजा च्या आईला attack  आला.....तिला हॉस्पिटल मध्ये घेऊन जाव लागल.....दुसऱ्या दिवशी मी अनुजा ला फोन करून विचारलं.......तुझ माझ्यावर प्रेम आहे कि नाही ?.......आपण सगळ सोडून देऊ........आपण पळून जाऊ..........दूर कुठे तरी जाऊ आणि आपल सुंदर विश्व निर्माण करू..........पण तिच्या बोलण्यात रोजच्या सारखा उत्साह नव्हता.....आणि तिने दिलेल्या उत्तरावर तर माझा विश्वासच बसत नव्हता................
ती म्हणाली  "तू मला विसर"   आपण आता एकत्र नाही येऊ शकत.......
 " मला कधीच  भेटणार   नाही "   अस  आई ने तिच्या कडून  वचन घेतलं होत......
तिला   आईच एक वचन  दिसलं पण मला दिलेली सगळी वचन तीने तोडून टाकली .............. आणि मला आयुष्याचा एका वळणावर एकट्याला  सोडून निघून गेली................त्यादिवशी मला  कळल कि जाती फक्त माणसा मध्येच नाहीत......तर प्रेमाला पण जात असते..............!