Saturday 22 September 2012

कोपरा....

कोपरा kopara



 कोपरा.....! हा शब्द ऐकल्यावरच  लगेच तुमच्या डोळ्या समोर फक्त एकच चित्र येते......ते म्हणजे घराची एक अडचणीची जागा.......जिथे तुम्ही तुम्हाला नको असलेल्या वस्तू ठेवून देता
जशी शाळेतली ती जुनी पुस्तक , तुमची लहान पनीची remote  ची car ,  तुमची जुनी कपडे वगैरे.......
कारण ह्या सगळ्या वस्तू आता तुम्हाला  नकोश्या झालेल्या आहेत म्हणून आपण त्या घराच्या एका कोपऱ्यात टाकून देतो......
"बरोबर आहे मुळात कोपरा असतोच त्यासाठी आणखी काय त्याच काम" हे सगळ्यांच एकमत उत्तर......तस तुमच पण बरोबर आहे कारण आपण कधी त्या घराच्या कोपऱ्याला एवढ महत्व  दिलच  नाही.........कारण एवढ असत तरी काय  त्या कोपऱ्यात ?
पण तुम्ही कधी विचार केलाय या कोपऱ्याने  तुमच्या बऱ्याच  वर्षाच्या आठवणी साठवून ठेवलेल्या असतात.......
कस आहे माणूस म्हंटल कि आठवणी असणारच आणि आपण त्या विसरणार सुद्धा साहजिक आहे........... पण तुम्ही विचार केलाय तो कोपरा वर्षा नु वर्षे त्या आठवणी जपून ठेवतो..........कारण आपल्या त्या आठवणीचा तो एकमेव सोबती असतो.....
तुमच्या घराच्या कोपऱ्यात जुनी पुस्तक पण पडली असतील आणि ती आता तुमच्या काहीच कामाची नसतील..........पण त्याच जुन्या पुस्तक मध्ये एक पुस्तक अस पण आहे.............ज्यातून तुम्ही तुमच पाहिलं love  letter  दिलेलं असत.....
ह्म्म्मम आठवल ना...............तुम्ही ते love  letter विसरलात पण त्या कोपऱ्याने ते पुस्तक आणि त्या बरोबरच्या सगळ्या गोड आठवणी जपून ठेवलेल्या आहेत......
आज तुमच्या कडे मस्त बाईक आहे......पण बाबांनी दिलेली ती पहिली remote  ची car आणि त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर आलेला आनंद त्या कोपऱ्याने अजूनही जपून ठेवलेला आहे.....
आपण कधी एवढा विचार केलाच नाही कि...........घराचा तो कोपरा, आपल्या एवढ्या आठवणीचा सोबती असेल म्हणून.....हो ना .
आणि अश्या बऱ्याच गोष्टी पण असतील ज्या आपण कोणालाच सांगीतल्या नाहीत......फक्त त्या तुम्हालाच  माहिती आहेत......पण  तुमच्या बरोबर त्या कोपऱ्याने   सुद्धा त्या सगळ्या आठवणी गुपीत ठेवलेल्या आहेत......
कारण आपल्या आठवणीचा तो खरा सोबती आहे............त्याने त्या तुमच्या  सगळ्या गोड आठवणी अजूनही त्याच्या उराशी जपून ठेवलेल्या आहेत......आणि त्याही कायमच्या.........!






No comments:

Post a Comment