Showing posts with label लेख. Show all posts
Showing posts with label लेख. Show all posts

Monday 22 October 2012

दगडा मधला देव

God

खरच देव दगडा मध्ये आहे का ?
असा प्रश्न कधी तुम्हाला पडला आहे……पण मला पडला आहे

अंधश्रध्ये पायी, बरेच भाबडे लोक बळी जाऊ लागले आहेत
आजही आपल्या खेड्या पाड्या मध्ये भोंदू बाबांच्या आहारी जाऊन लोक, आपल्या जिवलग लोकांचा जीव गमवतात.....
पण हे दृश्य आता खेड्या-पाड्या मध्येच नाही तर शहरा मध्ये पण दिसू लागल आहे……..आजकाल सुशिक्षित लोक सुद्धा अंधश्रध्येचे बळी पडत चालले आहेत

बरेच लोक दर सोमवारी शंकराच्या मंदिरात जाऊन १ लिटर दुध चढवतात याच आशेने कि देव आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल
पण तुम्ही हे का विसरता अख्ख्या भारता मध्ये दर दिवशी हजारो मुल उपाशी पोटी झोपतात आणि तुम्ही हजारो लिटर दुध देवाला वाहता.......माझी देवावर श्रद्धा नाही अस मी म्हणतच नाही पण त्याच एक लिटर दुधामधल  अर्धा  लिटर दुध जरी  एका गरीब मुलाला दिल तर त्या दिवशी  आपल्या मुळे एक मुलगा तरी उपाशी झोपला नाही ह्या गोष्टीने मनाला भेटणारी शांती हि देवाला चढवलेल्या एका लिटर दुधापेक्षा जास्त असेल हे नक्की….! आणि देव काही म्हणत नाही मला १ लिटरच दुध हव आहे त्याशिवाय मी तुझ्या इच्छा पूर्ण करणार नाही हे सगळे आपले मनाचे खेळ.
हे सर्व आपल्या श्रद्धे वर अवलंबून आहे कि आपण काय मानायचं आणि काय नाही "
जर तुम्ही अभ्यास केलाच नाहीत तर तुम्ही देवाला फक्त दुध चढवून पास होणार आहात का ?  नाही ना
तसच श्रद्धे बरोबर मेहनतीची पण गरज आहे तरच देव सुद्धा तुम्हाला मदत करेल देवावर श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नको......

असाच अजून एक मला आलेला अनुभव…….
मी ज्या रस्त्याने घरी जातो तिथे बरेच लोक सकाळी जॉगिंग करून झाल कि १० रुपयाची पारले-जी ची बिस्किटे कुत्र्यांना देतात पण त्याच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेली चार पाच लहान मुल या आशेने बघत असतात कि आता तरी हे लोक आम्हाला दोन बिस्किटे देतील पण हे कधीच होत नाही
का त्या लोकांना त्या मुलांच्या चेहऱ्या वरील भूक दिसून येत नाही का ?
कि त्या गरीब मुलापेक्षा ती कुत्री त्यांना जवळची वाटतात का ?
का त्यांना माणूस आणि जनावरा मधला फरक दिसून येत नाही
मला कोणाला काहीही शिकवणूक द्यायची नाही पण एक माणूस म्हणून माणसाची किंमत करायला नको
गरीब असला म्हणून काय झाल त्याला पण भूक लागते , उपाशी राहिल्यावर त्याला पण झोप लागत नाही
दगडाला तर देव आपण बनवला पण देवाने तर तर माणसातच एक देव लपवला आहे हे आपण विसरलो
विचारा त्या गरीब मुलाला त्याच्यासाठी जो त्याची भूक शमवतो तोच त्याचा देव,
विचारा त्या शिष्याला त्याला जो विद्या शिकवतो, तो गुरु त्याचा देव

सगळ्या रुपात देव माणसा मध्येच लपला आहे........कुठल्याही दगडच्या मूर्ती मध्ये नव्हे  
म्हणून देवाला माणसा मध्ये शोधा दगडात नव्हे……….





Tuesday 25 September 2012

प्रेमाची जात ( एक काल्पनिक कथा )




हो तुम्हाला हि प्रश्न पडला असेल ना प्रेमाला कधी जात  असते का.........? पण  मला कळल आहे.......कि प्रेमाला पण जात असते
बऱ्याच वर्षा पूर्वी मी कॉलेजला असताना अनुजा माझ्या जीवनात आली........... तीच ते सुन्दर  रूप आणि तिचे ते बोलके डोळे मला नेहमीच तिच्या जवळ जायला आकर्षित करायचे.........
                  
कॉलेज मध्ये असताना सगळ्यांचा गणित हा अवघड  विषय पण आमची त्यात महारथ त्यामुळे अनुजा ने मला तिला गणित शिकवायची request  केली होती.....आणि नाही म्हणायचा प्रश्न तर येतच नव्हता कारण मला पण , तिच्या अजून जवळ येण्याचा chance  हवा होता.....गणिताच्या शिकवणीच्या बहाण्याने मी तिच्या  घरी येऊ जाऊ लागलो....तिच्या घराचे पण आता  चांगले ओळखायला लागले होते......गणिताची सूत्र जुळवता जुळवता आमच्या प्रेमाची सूत्र कधी जुळली हे आम्हाला कळलच नाही
आंम्ही लग्न करायचं ठरवलं.......तिच्या घराचे पण मला चांगले ओळखत होते......त्यामुळे आम्हाला कधी प्रोब्लेम येईल अस आम्हाला कधीच वाटल नाही......आणि बघता  बघता तिच्या प्रेमात वर्ष  कशी निघून गेली कळलच नाही......आम्ही college  pass -out  झालो.......मला नोकरी लागली कि,  "मी तिच्या घरी तिचा हाथ मागायचा"  अस आमच ठरलं होत........
आणि तो दिवस आला............. मला एक चांगली नोकरी लागली......मला माझ्या नोकरी पेक्षा आता अनुजा कायमची माझ्या जीवनात येणार याचा आनंद  जास्त होता.....अनुजा पण खूप खुश होती कारण मी तिच्या घरी लग्नाची बोलणी करायला येणार होतो म्हणून.....

त्याच दिवशी संध्याकाळी मी तिच्या घरी पेढ्यांचा box  घेऊन गेलो......
तिचे आई बाबा घरीच होते..... आधी मी त्यांना नोकरी लागल्याच सांगितलं आणि ते खूप खुश झाले आणि खूप मोठा हो हा आशीर्वाद पण त्यांनी  दिला......
पण मी तर अजून खरी गोष्ट सांगितलीच नव्हती.....कस सांगू ?  ह्या एका प्रश्नाने माझ्या डोक्यात नुसत थैमान घातलं होत......तिकडून अनुजा सांग ना म्हणून खुणवत होती......पण माझा सगळा गोंधळ उडाला होता
पण हिंम्मत करून मी त्यांना “अनुजा मला आवडते आणि मला तिच्याशी लग्न करायचं हे” एका दमात सांगून टाकल 
आणि हे वाक्य ऐकल्यावर त्या खोलीत एकच     शांतता पसरली.....सगळे चूप......अनुजा चे बाबा उठले आणि म्हणाले नाही हे शक्य नाही......मी म्हणालो का काही कमी आहे का माझ्यात ?........चांगली नोकरी आहे.......स्वताच घर पण आहे......अजून काय हव लग्न करण्यासाठी.....?
ह्या प्रश्न वर त्यांनी दिलेलं उत्तर ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली....

"काय आहे तुझी जात ?"
   आम्ही ब्राम्हण आणि तू खालच्या जातीतला आमचा आणि तुझा मेळ काय.....  
तू कितीही पगार घेतलास , बंगला बांधलास,  तरी तू तुझी जात नाही बदलू शकत........मला त्यांच्याकडून हे उत्तर कधीच अपेक्षित नव्हत.....
त्या रात्री मी आणि अनुजा त्यांना किती समजावण्याचा प्रयत्न करत होतो पण आमचे सगळे प्रयत्न व्यर्थ.....याच बाचा बाची मध्ये अनुजा च्या आईला attack  आला.....तिला हॉस्पिटल मध्ये घेऊन जाव लागल.....दुसऱ्या दिवशी मी अनुजा ला फोन करून विचारलं.......तुझ माझ्यावर प्रेम आहे कि नाही ?.......आपण सगळ सोडून देऊ........आपण पळून जाऊ..........दूर कुठे तरी जाऊ आणि आपल सुंदर विश्व निर्माण करू..........पण तिच्या बोलण्यात रोजच्या सारखा उत्साह नव्हता.....आणि तिने दिलेल्या उत्तरावर तर माझा विश्वासच बसत नव्हता................
ती म्हणाली  "तू मला विसर"   आपण आता एकत्र नाही येऊ शकत.......
 " मला कधीच  भेटणार   नाही "   अस  आई ने तिच्या कडून  वचन घेतलं होत......
तिला   आईच एक वचन  दिसलं पण मला दिलेली सगळी वचन तीने तोडून टाकली .............. आणि मला आयुष्याचा एका वळणावर एकट्याला  सोडून निघून गेली................त्यादिवशी मला  कळल कि जाती फक्त माणसा मध्येच नाहीत......तर प्रेमाला पण जात असते..............!