Saturday 13 October 2012

खिडकी

khidaki the window



“ मेरे सामने वाली खिडकी मै एक चांद का तुकडा रेहता है “
या गाण्याचा अनुभव मला प्रत्यक्षात आला होता
माझ्या घराच्या समोरच एक घर आहे आणि त्याची घराची आणि माझी खिडकी एकदम समोरासमोर आहे
कधी तिथे कोणी राहत नव्हत त्यामुळे ती खिडकी नेहमीच बंद असयाची,
पण एके दिवशी असाच मी उठून बसलो होतो आणि सहज खिडकीच्या बाहेर डोकावतो....तर काय बघतो कि समोरची खिडकी उघडी
“आल असेल कोणी तरी नवीन राहायला” आणि उघडली असेल खिडकी म्हणून मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केल.........पण एका मुलीच्या हसण्याच्या आवाजाने माझ लक्ष त्या खिडकी कडे पुन्हा वळाल पण कोणी दिसलं नाही म्हणून मी थांबून राहिलो
एका सुंदर सफेद रंगाच्या चुडीदार मध्ये एक मुलगी हसत होती मला फक्त तिची एक छबी च दिसली ती पण पाठमोरी......पण किती गोड हसत होती ती.....
म्हणून  तिला पाहण्याचा मोह काय मला आवरत नव्हता पण मी काहीच करू शकत नव्हतो
म्हणून तास भर, ती आता तरी खिडकी समोर येईल याची वाट पाहत बसलो होतो
कारण तिची ती पाठमोरी सुंदर छबी माझ्या डोळ्यासमोरून जायचं नावच घेत नव्हती.....पण माझ नशीब आज काही मला साथ देत नव्हत........म्हणून मी आजच्या दिवशीची हार पत्करून उद्या पुन्हा प्रयत्न करायचा या आशेने माझ्या कामाला लागलो
आणि दुसऱ्या दिवशी उठून, ती मला आज तरी दिसेल या वेड्या आशेने पुन्हा तिची वाट पाहत खिडकी समोर उभा होतो......आणि ती त्यादिवशी ती मला दिसली नुकतीच आंघोळ करून ती तिचे केस सुकवायला खिडकीत आली होती
एक सुंदर परी समोर उभी कि काय असा मला भास झाला......तीच ते सुंदर रूप बघून मी तर फक्त तिला नुसता पाहत राहिलो ......तिचे ते ओले केस तिच्या गोऱ्या गालाबरोबर खेळत होते आणि त्या खेळाला साथ द्यायला वारा पण मदतीला आला होता...
वाह काय सुंदर दृश्य होत ते खूप सुंदर दिसत होती.....ती  तीच ते सुंदर रूप व्यक्त करायला मला तर शब्द सुद्धा अपुरे पडतील कि काय अस वाटत.....आता तर रोज माझा तो नित्यक्रम झाला होता सकाळी उठायचं आणि तिची एक झलक बघण्यासाठी खिडकी समोर तास न तास उभ राहायचं
पण अचानक दोन दिवस झाले तरी ती दिसली नाही म्हणून मी  खूप बेचैन झालो आमच्या उनाड Gang कडून चौकशी केली तर अस समजल ती तर एक पाहुनी होती फक्त ४ दिवस राहायला आली होती आणि त्यांच्या त्या बोलण्याने माझ्या सगळ्या स्वप्नावर पाणी फिरलं.........कितीतरी स्वप्न पहिली होती मी तीच्यासाठी पण त्याचा आता काही उपयोग नव्हता
तरीही अजूनही मी रोज त्या खिडकी समोर उभा असतो.........कि कधीतरी ती खिडकी उघडी होईल आणि ती माझ्या समोर पुन्हा येईल या एकाच आशेने......

                                                                                                                      -  विशाल कदम

No comments:

Post a Comment