Showing posts with label लग्न. Show all posts
Showing posts with label लग्न. Show all posts

Thursday, 18 October 2012

पाठवणी

पाठवणी


आज तिच्या आयुष्यातला खूप  महत्वाचा दिवस................लग्न करून आज ती पहिल्यांदा सासरी चालली होती......
लग्न होई पर्यंत तिच्या मनात  कसले हि विचार आले नव्हते पण आज पाठवणी च्या वेळी मनात नुसत्या विचारांच्या लाटा एका मागो माग एक आपटत होत्या.....
तशी ती खूप खुश होती......लग्न Arrange  जरी असलं तरी मुलगा तिने  पसंद केला होता....त्यामुळे तिच्या आवडीचा काही प्रश्नच  येत नव्हता.....
पण ते घर सुद्धा आपल्या घरासारखाच  असेल ना ?
पण त्या घरातले मला समजून घेतील  ना ?
" पण "......हा एकच शब्द तिच्या डोक्यातून काही केल्या हटायला तयारच  नव्हता
तस  कारण सुद्धा होत , आज पहिल्यांदा ती २४ वर्ष राहिलेल्या आपल्या हक्काच्या घराला सोडून एका अनोळखी घराला आपल म्हणायला चालली होती......
हक्काच्या आई बाबांना सोडून तिने कधीच कोणाला आई आणि बाबा  म्हणून हाक मारली नव्हती.......पण आज पासून पुढे तिला ते कराव लागणार होत...........
आई-बाबांची लाडकी मी......पण मला तिथे पण तेच प्रेम भेटेल का ? कस असेल तिथे वातावरण ? , कशी असतील  तिथली लोक ? , कसा असेल आपला हक्काचा नवरा ज्याच्या सोबत आपण उरलेलं आयुष्य घालवणार आहे ,
अश्या बऱ्याच प्रश्नांनी तिला भंडावून सोडलं होत  
डोक्यात  नुसता प्रश्नाचा तांडव सुरु होता पण हे तांडव काही केल्या  थांबेना
त्या दिवशीची  रात्र तिने अशीच फक्त कूस बदलून घालवली आणि सकाळची वाट पाहत रात्र पुरती अशीच निघून गेली
सकळी नेहमी प्रमाणे उशीरा उठता लवकर तयार होऊन किचन मध्ये हाथभारासाठी गेली....पण मनाची चलबिचल तशीच सुरु होती आणि सासू बाई किचन मध्ये आधी पासूनच होत्या त्यामुळे पुरती भांबावून गेली ती.....
उठलीस तू ? एवढ्या लवकर कशाला उठलीस...."काल दिवसभर दग-दग झाली असेल ना तुझीआराम करायचा ना अजून "  हे एवढ वाक्य ऐकून तिच्या मनातल वादळ तेवढ्या पुरती का होइ ना पण ते शांत झाल होत.....
पण हे किचन  आपल नव्हत साखर कुठे असेलचहा पावडर कुठे असेलह्याचा मोठा प्रश्न तिला सतावत होता पण सासू बाईंनी  सर्व नीट समजावून सांगितलं आणि तिला चहा बनवायला मदत केली
आणि सासू बाईचा  एवढा चांगला स्वभाव बघून तिचा जीव पुरता भांड्यात पडला......
सासऱ्यांनी पण चहाच कौतुक केल.....आणि ह्यांनी सुद्धा.....त्या एका दिवसात सगळ्या सासरची पुरती ओळख  झाली तिला
आणि तिच्या मनाची सगळी चल-बिचल एकदम थांबली.....आणि तिने सगळ्यांना एका दिवसात आपलस करून घेतलं.....आणि एका दिवसात सासरच घर  तिच्या हक्काच घर झाल..........आणि तिच्या  आई-बाबा नंतर तिला अजून हक्क्चे नवीन आई-बाबा भेटले........त्या दिवसा पासून तिच्या आयुष्याची खऱ्या अर्थाने एक नवीन पहाट झाली होती........... 

त्या दिवशी तिला एक गोष्ट कळली........लग्न म्हणजे नुसती तडजोड नव्हे तर सगळ्यांना आपलस करून घेण.......आणि आपल्या  आयुष्याच्या एका नव्या पर्वाला सुरवात करण....


                                                  -    विशाल कदम