Showing posts with label ललित. Show all posts
Showing posts with label ललित. Show all posts

Saturday, 3 November 2012

शेवटची भेट

शेवटची भेट

आजचा दिवस खूप लवकर जातोय अस वाटत होत.......सकाळपासून मन नुसत बेचैन झाल  होत....ऑफिस मध्ये कामात पण लक्ष लागत नव्हत
आजची  संध्याकाळ होऊच नये अस वाटत होत.......पण वेळ कोणासाठी थांबली आहे का ? बघता बघता वाजले आणि मी ऑफिस मधुन निघालो
तिने नेहमी प्रमाणे मला जुहू बीचला भेटायला बोलावलं......ती वाजता येणार होती, म्हणून मी १५  मिनिटे आधीच आलो होतो खूप साऱ्या प्रश्नाची उत्तर हवी होती मला तिच्याकडून.........
संध्याकाळची वेळ असल्यामुळे पाणीपुरीवाला,भेळवालाच्या stall  वर  खूप गोंगाट आणि रहदारी होती.......म्हणून मी पुढे जाऊन एका ठिकाणी बसलो....समोर अथांग समुद्र पसरला होता आणि क्षितीज्या जवळ सूर्य मावळता होता...........जणू तो काही आज आमच्या भेटीच्या साक्षीसाठी थांबला होता.......
इतक्यात ती समोरून येताना दिसली.......आज माझ्या आवडीचा सफेद रंगाचा सलवार कमीज घातला होता.......खूप सुंदर दिसत होती आणि मावळत्या सूर्याच्या त्या गुलाबी प्रकशात तीच  ते सुंदर रूप अजूनच खुलून दिसत होत.....पण आज रोजच्या सारख हसू तिच्या चेहऱ्यावर नव्हत.....खूप शांत दिसत होती ती........आणि त्याला कारण पण तसच होत,
ती माझ्या पासून थोड्या अंतरावर बसली....... आम्ही दोघेपण शांत बसलो होतो.........कोणीही  बोलायच्या  मनस्थितीतच नव्हत........मी समोरच्या  मावळत्या सूर्याच्या क्षितीजाकाडे नजरा लावून बसलो होतो..........अस वाटत होत वेळेच चक्र थांबल कि काय..........आणि माझ्या डोळ्यासमोर ती घटना पुन्हा आठवली.

दिवस आगोदर

मीका रुतुसोड सगळ आपण परस्पर लग्न करू.....मी सगळ manage  करतो...तू काही tension  नको घेऊ.
रुतु : नाही विशू.....मला नाही जमणार...मी माझ्या आई वडिलांच्या विरोधात नाही जाऊ शकत....मी त्यांना समजावेन
मी : पण किती दिवस.....दोन महिने झाले रोज तेच चालू आहे आपल...तुझ्या घराचे ऐकणार नाहीत...मला माहिती आहे
रुतु : पण मी अजून प्रयत्न करतेय...
 मी : अजून हे किती दिवस चालणार रुतु.....ते आपल्या लग्नाला कधीच परवानगी देणार नाहीत...हे मला माहिती आहे आणि तुला पण....तरीही हा अट्टाहास का ?
तुझ माझ्यवर प्रेम आहे ना....बस मला एवढ पुरेस आहे...आपण नव्याने आपल आयुष्य सुरु करू....तू फक्त हो म्हण
रुतु : नाही विशू....मी नाही सोडू शकत माझ्या आई-वडिलांना....मला ते हवे आहेत.....
मी :  मग मी नाही हवा ?
रुतु : मला तुम्ही दोघ हवे आहात....मी काय करू ? 
मी : हे बघ तुला काय तो निर्णय घ्यावाच लागेल....एकतर मी किंवा तुझे आई-वडील ? मी सगळा निर्णय तुझ्यावर सोडलाय (आणि मी निघून गेलो....)

चार दिवस आम्ही एकमेकांना ना फोन केला ना SMS.......सहाव्या दिवशी तिनेच फोन केला

रुतु : हेलो विशू...मी बोलतेय
मी    : हो बोल....काय काम आहे..
(दहा मिनिटे ती बोललीच नाही )
मी : रुतु तू आहेस ना....
रुतु   :  हो....आहे ( तिचा आवाज जड वाटत होता )
मी : काय झाल ?
रुतु : मी माझ्या आई-वडिलांना नाही सोडू शकत....विशु...तूच सांग मी काय करू....आपणाला वेगळ व्हावच लागेल...माझ्याकडे काहीच पर्याय नाही....आणि  ती रडायला लागली
मला काय बोलाव हेच कळेना....मला हे उत्तर अपेक्षितच नव्हत....
रुतु : तू मला उद्या संध्याकाळी  वाजता भेट
आणि तिने फोन ठेवला.......

विशु...विशु....तिच्या आवजाने मी भानावर आलो....
विशु खूप उशीर होतोय........मला निघायला हव.....इतक्यात तिने तिच्या पर्स मध्ये हाथ घातला आणि मी दिलेली सर्व ग्रीटींग्स  आणि लेटर मला दिली

मी : का रुतु ? तुला आता मी नकोसा झालोय
रुतु : नाही विशु....मी तुझ्याशिवाय कोणावरही प्रेम केल नाही....पण काही प्रश्न असे  असतात ज्यांची  उत्तर सापडलेलीच बरी..... Please  विशु आता मला काहीच विचारू नको.....please 

मी हि त्यावर काही बोललो नाही.....आम्ही दोघ पण तसेच शांत बसलो होतो.....सूर्य क्षितिजावरून खाली जात होता...जणू काही तो हि हेच सांगत होता....आता वेळ संपत आली आहे
ती अचानक उठली आणि मला म्हणाली  
विशु............( तिचे डोळे लाल झाले होते.....तिला शब्द जड झाले होते )...मी........मी आता तुला कधीच भेटणार नाही

तिने माझा हाथ तिच्या हाथात घेतला.....आणि म्हणाली....विशु मला विसरण्याचा प्रयत्न कर.........माझ्या सगळया आठवणी विसरून जा....माझ्यासाठी तुझ आयुष्य खराब करू नकोस ...... खूप मोठा हो.........मी आता तुला कधीच भेटणार नाही.....हि आपली शेवटची भेट........आणि ती मला तिथेच सोडून निघून गेली आणि मी तसाच तिच्या पाठमोऱ्या छबी कडे पाहत राहिलो........शेवटपर्यंत.........