Showing posts with label लेख. Show all posts
Showing posts with label लेख. Show all posts

Saturday 22 September 2012

कोपरा....

कोपरा kopara



 कोपरा.....! हा शब्द ऐकल्यावरच  लगेच तुमच्या डोळ्या समोर फक्त एकच चित्र येते......ते म्हणजे घराची एक अडचणीची जागा.......जिथे तुम्ही तुम्हाला नको असलेल्या वस्तू ठेवून देता
जशी शाळेतली ती जुनी पुस्तक , तुमची लहान पनीची remote  ची car ,  तुमची जुनी कपडे वगैरे.......
कारण ह्या सगळ्या वस्तू आता तुम्हाला  नकोश्या झालेल्या आहेत म्हणून आपण त्या घराच्या एका कोपऱ्यात टाकून देतो......
"बरोबर आहे मुळात कोपरा असतोच त्यासाठी आणखी काय त्याच काम" हे सगळ्यांच एकमत उत्तर......तस तुमच पण बरोबर आहे कारण आपण कधी त्या घराच्या कोपऱ्याला एवढ महत्व  दिलच  नाही.........कारण एवढ असत तरी काय  त्या कोपऱ्यात ?
पण तुम्ही कधी विचार केलाय या कोपऱ्याने  तुमच्या बऱ्याच  वर्षाच्या आठवणी साठवून ठेवलेल्या असतात.......
कस आहे माणूस म्हंटल कि आठवणी असणारच आणि आपण त्या विसरणार सुद्धा साहजिक आहे........... पण तुम्ही विचार केलाय तो कोपरा वर्षा नु वर्षे त्या आठवणी जपून ठेवतो..........कारण आपल्या त्या आठवणीचा तो एकमेव सोबती असतो.....
तुमच्या घराच्या कोपऱ्यात जुनी पुस्तक पण पडली असतील आणि ती आता तुमच्या काहीच कामाची नसतील..........पण त्याच जुन्या पुस्तक मध्ये एक पुस्तक अस पण आहे.............ज्यातून तुम्ही तुमच पाहिलं love  letter  दिलेलं असत.....
ह्म्म्मम आठवल ना...............तुम्ही ते love  letter विसरलात पण त्या कोपऱ्याने ते पुस्तक आणि त्या बरोबरच्या सगळ्या गोड आठवणी जपून ठेवलेल्या आहेत......
आज तुमच्या कडे मस्त बाईक आहे......पण बाबांनी दिलेली ती पहिली remote  ची car आणि त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर आलेला आनंद त्या कोपऱ्याने अजूनही जपून ठेवलेला आहे.....
आपण कधी एवढा विचार केलाच नाही कि...........घराचा तो कोपरा, आपल्या एवढ्या आठवणीचा सोबती असेल म्हणून.....हो ना .
आणि अश्या बऱ्याच गोष्टी पण असतील ज्या आपण कोणालाच सांगीतल्या नाहीत......फक्त त्या तुम्हालाच  माहिती आहेत......पण  तुमच्या बरोबर त्या कोपऱ्याने   सुद्धा त्या सगळ्या आठवणी गुपीत ठेवलेल्या आहेत......
कारण आपल्या आठवणीचा तो खरा सोबती आहे............त्याने त्या तुमच्या  सगळ्या गोड आठवणी अजूनही त्याच्या उराशी जपून ठेवलेल्या आहेत......आणि त्याही कायमच्या.........!






Thursday 20 September 2012

प्रेम म्हणजे काय ?

प्रेम म्हणजे काय ?



प्रेम म्हणजे काय ?   हा प्रश्न माझ्यासारखा बऱ्याच जणांना पडला आहे
पण तज्ञ लोंकाच म्हणन अस आहे कि,

To some Love is friendship set on fire ..........for others Maybe love is like luck.
You have to go all the way to find it. No matter how you define it or feel it, love is the eternal truth in the history of mankind.

पण बरयाच जणांना ह्या प्रश्नाच साध आणि सरळ उत्तर भेटलं नसाव......मला ही अजून भेटलं नाही..... 
साहजिक आहे...बायकांच्या मनातल कस ओळखाव या top  list  प्रश्नानंतर याच प्रश्नाचा number  येतो
जस प्रेम फक्त व्यक्त करता येत  पण ते मोजता येत नाही तसच प्रेम म्हणजे नेमक काय ह्याच उत्तर देन थोड कठीण च आहे
कारण प्रेमाची परिभाषा  प्रत्येक व्यक्ती नुसार बदलत जाते.....
कधी आई ने काळजी पोटी डोक्यावर फिरवलेला हाथ.....हे आईच्या प्रेमाच लक्षण.....
कधी प्रेयसी ने काळजी पोटी केलेला एक sms......हे प्रेयसीच्या प्रेमाच लक्षण.....
जरी लक्षण वेगळी असली तरी त्यांनी व्यक्त केलेली भावना हे प्रेमच....
म्हणजे या वरून आपल्याला कळल कि प्रेमाची परिभाषा प्रत्येक व्यक्ती नुसार बदलत जाते......
पण "प्रेम व्यक्त कस कराव" हा अजून एक प्रश्न मला सारखा सतावतो.......कारण ,
"व्यक्ती तश्या वल्ली" या प्रमाणे "मुली तश्या त्यांच्या आवडी"......
कोणाला गिफ्ट देऊन आपण त्यांच्यावर किती प्रेम करतो अस दाखवून द्याव लागत ,
तर कोणाला रोज sms करून i love you  म्हणून प्रेम व्यक्त कराव लागत  ,
पण माझी समस्या काही वेगळीच होती...
कधी गुलाब घेऊन गेलो तर म्हणायची....काय हे old fashioned प्रेम आहे तुझ......
आणी expensive गिफ्ट देऊया म्हंटल कि आमचा खिसा नेहमीच रिकामा.......त्यामुळे आमच प्रेम हे नेहमी old fashion  राहील.... 
पण कधी कधी वाटत किती या मुलींच्या तरा........एखादा प्रेमाचा crash  course  लावायला हवा......."How to Express Love ?"
मग आपण मुलांनी करायचं तरी काय........आता तुम्हीच सांगा.......
माझ्या मते प्रेम हे आपो आप व्यक्त होत असत....जर मुळातच ती व्यक्ती तुम्हाला खूप आवडत असेल....आणि तुम्ही तिच्यावर मना पासून प्रेम करत असाल तर आपल्या आवडत्या व्यक्ती ने कशाही प्रकारे प्रेम व्यक्त केल तरी ते तुम्हाला आवडेलच.....मग तो एक साधा sms असू दे किंवा त्या व्यक्तीची एक  प्रेमळ smile असू दे.....ती तुम्हाला आवडेलच  
माझ्या मते जर मनापासून प्रेम व्यक्त केल तर ते तुमच्या आवडत्या व्यक्तीला जरूर आवडेल.....मग तो तिला दिलेला एक साधा गुलाब पण तिला अमुल्य वाटेल.......
प्रेमाची व्याख्या तशी सोप्पी नाही.....पण मला समजलेली व्याख्या,
"प्रेम म्हणजे एक गोड अनुभती....जी सगळ्यांना कशी व्यक्त करावी हे समजत नाही.....पण आपण ज्या व्यक्ती वर मना पासून प्रेम करतो त्या व्यक्ती वर आपण खूप प्रेम कराव म्हणजे आपल्या प्रेमाची अनुभूती त्या व्यक्तीला पण येईल "