साजणी नभात नभ दाटून आले,
कावरे मन हे झाले तू ये ना साजणी......
साजणी छळतो मझ हा मृद्गंध ,
तुझ्या स्पर्शास मी धुंद तू ये ना साजणी......
ह्या वरच्या चार ओळी वाचल्यावर प्रत्येकाच्या मनात तिची आठवण आली नसेल अस होणारच नाही....आणी ती कोण हे मला सांगायची गरज नाही
प्रत्येकाच्या मनात ती आहे....आणि प्रत्येकासाठी ती खूप प्रिय आहे.....
तिच्या बद्दल जेवढ कौतुक कराव तेवढ कमीच आहे.....
ती कधी माझ्या डोळ्यासमोरून ओझळ होऊ नये अस मला नेहमी वाटत...
तिची आठवण जरी झाली ना......तरी माझ्या चेहऱ्यावर एक हास्य उमलत......हो आहेच ती एवढी स्तुती करण्या सारखी......
फक्त तिच्यासाठी कवी व्हावस वाटत.......आणी माझ्या सगळ्या कविता फक्त तिच्यासाठी कराव्याश्या वाटतात.....
ती नेहमीच खूप सुंदर दिसायची...ती नेहमीच खूप गोड हसायची....तीच ते अप्रतिम सौंदर्य मला नेहमीच भुरळ घालायचं......
हो माझ्यासाठी जगात फक्त ती एकटीच सुंदर आहे.....आणी माझ्या मनात फक्त तिचीच एक सुंदर छबी आहे....
मला कधी भेटायला उशीर झाला कि तिचा तो नेहमीचा खोटा खोटा राग....मी कधी दुसऱ्या मुलीची तारीफ केली कि तिचा फुसका धाक.........मी कधीच विसरू शकत नाही....
मी कधी ओरडलो तर तिचे ते पाणावलेले डोळे....माझ्या मनाला नेहमी हुरहूर लावायचे...
खूप हळवी होती ती.....माझ्यावर खूप प्रेम करायची....
तीच मी आजारी असलो कि नेहमी काळजी करण......”तुला सांगितलं होत ना बाहेरच काही खात जाऊ नको बघ पडलास ना आता आजारी” म्हणून मला ओरडण........अन रात्री "काळजी घे" म्हणून पाठवलेला तिचा तो एक sms तिच्या मनातल बराच काही सांगून जायचा.....
तिला ना chocolate खूप आवडायचं आणी ती नेहमी chocolate चा हट्ट करायची......मला माहिती होत, तरी पण मी मुद्दाम रागावायचो कारण त्या नंतरच तीच ते मला मनावन मला नेहमीच हव-हवस वाटायचं.........
ती नेहमी म्हणायची....एवढ्या कविता करतोस.....कधी माझ्यावर पण एक कविता कर ना....पण माझ्या तर सगळ्या कविता ह्या फक्त तिच्या साठीच असायच्या.....हे कधी तिला सांगू शकलो नाही....
मी तिच्यावर कितीही रागवायचा प्रयत्न केला तरीही तीच एक हास्य मला माझा सगळा राग विसरायला लावायचं....म्हणून मी कधी तिच्यावर रागावू शकलो नाही........हो फक्त तीच एक हास्य......तुम्हला मी वेडा तर वाटत नाही ना......पण खर सांगू हो आहेच मी वेडा.........पण फक्त तिच्या प्रेमात वेडा.....
तिची आठवण आली ना कि माझ्या मनात तिच्या सगळ्या आठवणीची एकच गर्दळ होते......
तिच्या बद्दल मी कितीही सांगितलं तरीही ते माझ्यासाठी अपूरच आहे....... कारण माझ्या जगात फक्त ती आहे......आणि सगळीकडे फक्त ती आणी तीच....
माझ्या स्वप्नात ती,
माझ्या मनात ती,
माझ्या आयुष्यातला एक पर्व ती......
जगासाठी निराधार मी...पण माझ्या आयुष्याचा आधार ती......
ती दुसरी तिसरी कोणी नसून माझ्या मनातली साजणी आहे.......................
No comments:
Post a Comment