Saturday, 13 October 2012

खिडकी

khidaki the window



“ मेरे सामने वाली खिडकी मै एक चांद का तुकडा रेहता है “
या गाण्याचा अनुभव मला प्रत्यक्षात आला होता
माझ्या घराच्या समोरच एक घर आहे आणि त्याची घराची आणि माझी खिडकी एकदम समोरासमोर आहे
कधी तिथे कोणी राहत नव्हत त्यामुळे ती खिडकी नेहमीच बंद असयाची,
पण एके दिवशी असाच मी उठून बसलो होतो आणि सहज खिडकीच्या बाहेर डोकावतो....तर काय बघतो कि समोरची खिडकी उघडी
“आल असेल कोणी तरी नवीन राहायला” आणि उघडली असेल खिडकी म्हणून मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केल.........पण एका मुलीच्या हसण्याच्या आवाजाने माझ लक्ष त्या खिडकी कडे पुन्हा वळाल पण कोणी दिसलं नाही म्हणून मी थांबून राहिलो
एका सुंदर सफेद रंगाच्या चुडीदार मध्ये एक मुलगी हसत होती मला फक्त तिची एक छबी च दिसली ती पण पाठमोरी......पण किती गोड हसत होती ती.....
म्हणून  तिला पाहण्याचा मोह काय मला आवरत नव्हता पण मी काहीच करू शकत नव्हतो
म्हणून तास भर, ती आता तरी खिडकी समोर येईल याची वाट पाहत बसलो होतो
कारण तिची ती पाठमोरी सुंदर छबी माझ्या डोळ्यासमोरून जायचं नावच घेत नव्हती.....पण माझ नशीब आज काही मला साथ देत नव्हत........म्हणून मी आजच्या दिवशीची हार पत्करून उद्या पुन्हा प्रयत्न करायचा या आशेने माझ्या कामाला लागलो
आणि दुसऱ्या दिवशी उठून, ती मला आज तरी दिसेल या वेड्या आशेने पुन्हा तिची वाट पाहत खिडकी समोर उभा होतो......आणि ती त्यादिवशी ती मला दिसली नुकतीच आंघोळ करून ती तिचे केस सुकवायला खिडकीत आली होती
एक सुंदर परी समोर उभी कि काय असा मला भास झाला......तीच ते सुंदर रूप बघून मी तर फक्त तिला नुसता पाहत राहिलो ......तिचे ते ओले केस तिच्या गोऱ्या गालाबरोबर खेळत होते आणि त्या खेळाला साथ द्यायला वारा पण मदतीला आला होता...
वाह काय सुंदर दृश्य होत ते खूप सुंदर दिसत होती.....ती  तीच ते सुंदर रूप व्यक्त करायला मला तर शब्द सुद्धा अपुरे पडतील कि काय अस वाटत.....आता तर रोज माझा तो नित्यक्रम झाला होता सकाळी उठायचं आणि तिची एक झलक बघण्यासाठी खिडकी समोर तास न तास उभ राहायचं
पण अचानक दोन दिवस झाले तरी ती दिसली नाही म्हणून मी  खूप बेचैन झालो आमच्या उनाड Gang कडून चौकशी केली तर अस समजल ती तर एक पाहुनी होती फक्त ४ दिवस राहायला आली होती आणि त्यांच्या त्या बोलण्याने माझ्या सगळ्या स्वप्नावर पाणी फिरलं.........कितीतरी स्वप्न पहिली होती मी तीच्यासाठी पण त्याचा आता काही उपयोग नव्हता
तरीही अजूनही मी रोज त्या खिडकी समोर उभा असतो.........कि कधीतरी ती खिडकी उघडी होईल आणि ती माझ्या समोर पुन्हा येईल या एकाच आशेने......

                                                                                                                      -  विशाल कदम

Tuesday, 9 October 2012

" लग्न म्हणजे काय असत "

lagn mhnje kay


लग्न म्हणजे काय असत ,
आपल सोडून सगळ्याचच छान असत ,

लग्ना आधी वाटते ती "आहे एक सुंदर अप्सरा"
पण लग्नानंतर वाटते "ही तर नेहंमीचीच आहे, दुसरीकडे तोंड मारू जरा"

लग्ना आधी तिच्या जेवणाच नेहमीच कौतुक असत
पण लग्नानंतर तेच जेवण खाणावळीतल्या सारख वाटायला लागत

लग्ना आधी हॉटेलात जायची हौस असते भारी
पण लग्नानंतर हॉटेलात जान नेहमीच खिशाला पडे भारी

बायको तर तीच आहे तरी लग्नानंतर का वाटे ती वेगळी ?
लग्न नावाची जादू आहे काही आगळी-वेगळी

म्हणून सांगतो मित्रांनो प्रेम करा लग्न कधीच नको
आपल्या बॅचलर आयुष्यात बायको नावाची कट-कट कधीच नको........


                                                                                                                       -   विशाल कदम

Wednesday, 3 October 2012

चौकट

chaukat





आपण आपल्या आयुष्याला एका चौकटीच्या आतच ठेवलं आहे........आणि आपण एका मर्यादित चौकटीतच जीवन जगतोय अस कोणाला वाटत का ?
कदाचित काही लोकांच उत्तर हो असेल तर काहींच नाही.....कारण काही लोकांना या चौकटीच्या पलीकडे जायचाच नाही तर काही लोकांना या सगळ्या चौकटी ओलांडून त्याच्या सगळ्या हद्द पार करायच्या  आहेत पण ते करत नाहीत....
पण काय आहे हि चौकट ? प्रत्येक माणसा प्रमाणे ह्या चौकटीची व्याख्या बदलत जाते.....तुम्हाला कधी अस वाटत नाही आपण रोज एक routine  life  जगतोय...रोज त्याच वेळेला उठन, तीच ट्रेन रोज तेच office  च काम......पण यावर तुम्ही म्हणाल हे तर सगळेच करतात......त्याला पर्याय नाही पण आम्ही  शनिवार आणि रविवारी एन्जोय करतो..... 
आम्ही दर शनिवारी आणि रविवारी बाहेर जेवायला जातो, महिन्यातून एका रविवारी movie  बघतो , आणि ३ महिन्यातून एकदा बाहेर फिरायला जातो.......म्हणजे हि  पण एका प्रकारे तुम्ही आखलेली एक चौकटच ना आणि ते पण एक routine च आहे  कि नाही........
रोज जेवण बनवायला कंटाळा येतो ह्या सत्याला पांघरून घालायला तुम्ही शनिवारी आणि रविवारी बाहेर जाता अस मला सांगता.....
आता तुम्ही स्वताला च काही प्रश्न विचारा.....
ह्या रोजच्या routine  work  मध्ये तुम्ही काही नवीन करता का ?....office  मध्ये काम नसल कि तुम्ही कधी काही वेगळ करायचा प्रयत्न करता का ?
ह्यावर सगळ्यांचा प्रश्न म्हणजे आम्ही नक्की करायचं काय ?
हेच.....या तुमच्या आखलेल्या चौकटीतून बाहेर पडाल तर तुम्ही विचार कराल ना....अरे बाहेर बघा.....हे office  , घर , आणि रोजच routine  काम सोडून  सुद्धा बाहेर एक जग आहे......आणि ते खूप सुंदर आहे......
काहीतरी वेगळ करायचा प्रयत्न तरी करा........फक्त बाहेर जेवायला जाण्यापेक्षा एका रविवारी तुम्ही जेवण बनवा आणि तुमच्या हाथाने तिला  जेवू घाला......त्या भाजीत तिखट-मीठ कमी असल तरी ती भाजी तुमच्या हाथून खाताना  तिच्या चेहऱ्यावरचा आनंद त्या five  star  हॉटेल मध्ये जेवलेल्या  जेवणा पेक्षाही जास्त असेल....
movie  बघण्यापेक्षा बऱ्याच वर्षा पासून तुम्ही न गेलेल्या मराठी नाटकांना जावा......नाहीतर असच तिच्या बरोबर  भटकायला निघा......३ तास movie  मध्ये तिच्या  बाजूला शांत बसण्या पेक्षा तिच्याशी छान गप्पा मारा.......बघा तुम्हाला किती बर वाटेल.....
अरे मित्रानो फिरा , मजा करा आयुष्य खूप सुंदर आहे आयुष्याला एका चौकटीत आखून ठेवू नका....ह्या आखलेल्या चौकटीतून कधीतरी बाहेर पडा , काहीतर आज वेगळ करा म्हणजे तुमचं सुंदर आयुष्य अजून सुंदर होईल........







Saturday, 29 September 2012

साजणी




साजणी नभात नभ दाटून आले,
कावरे मन हे झाले तू ये ना साजणी......
साजणी छळतो मझ हा मृद्गंध ,
तुझ्या स्पर्शास मी धुंद तू ये ना साजणी......

ह्या वरच्या चार ओळी वाचल्यावर प्रत्येकाच्या मनात तिची आठवण आली नसेल अस होणारच नाही....आणी  ती कोण हे मला सांगायची गरज नाही
प्रत्येकाच्या मनात ती आहे....आणि प्रत्येकासाठी ती खूप प्रिय आहे.....
तिच्या बद्दल जेवढ कौतुक कराव तेवढ कमीच आहे.....
ती कधी माझ्या डोळ्यासमोरून ओझळ होऊ नये अस मला नेहमी वाटत...
तिची आठवण जरी झाली ना......तरी माझ्या चेहऱ्यावर एक हास्य उमलत......हो आहेच ती एवढी स्तुती करण्या सारखी......
फक्त तिच्यासाठी कवी व्हावस वाटत.......आणी माझ्या सगळ्या कविता फक्त तिच्यासाठी कराव्याश्या वाटतात.....
ती नेहमीच खूप सुंदर दिसायची...ती नेहमीच खूप गोड हसायची....तीच ते अप्रतिम सौंदर्य मला नेहमीच भुरळ घालायचं......
हो माझ्यासाठी जगात फक्त ती एकटीच सुंदर आहे.....आणी माझ्या मनात फक्त तिचीच एक सुंदर छबी आहे....
मला कधी भेटायला उशीर झाला कि तिचा तो नेहमीचा खोटा खोटा राग....मी कधी दुसऱ्या मुलीची तारीफ केली कि तिचा फुसका धाक.........मी कधीच विसरू शकत नाही....
मी कधी ओरडलो तर तिचे ते पाणावलेले डोळे....माझ्या मनाला नेहमी हुरहूर लावायचे...
खूप हळवी होती ती.....माझ्यावर खूप प्रेम करायची....
तीच मी आजारी असलो कि नेहमी काळजी करण......”तुला सांगितलं होत ना बाहेरच काही खात जाऊ नको बघ पडलास ना आता आजारी” म्हणून मला ओरडण........अन रात्री "काळजी घे" म्हणून पाठवलेला तिचा तो एक sms तिच्या मनातल बराच काही सांगून जायचा.....

तिला ना chocolate  खूप आवडायचं आणी ती नेहमी chocolate चा हट्ट करायची......मला माहिती होत, तरी  पण मी  मुद्दाम रागावायचो कारण त्या नंतरच तीच ते मला  मनावन मला नेहमीच  हव-हवस वाटायचं.........
ती नेहमी म्हणायची....एवढ्या कविता करतोस.....कधी माझ्यावर पण एक कविता कर ना....पण माझ्या तर सगळ्या कविता ह्या फक्त तिच्या साठीच असायच्या.....हे कधी तिला सांगू शकलो नाही....
मी तिच्यावर कितीही रागवायचा प्रयत्न केला तरीही तीच एक हास्य मला माझा सगळा राग विसरायला लावायचं....म्हणून मी कधी तिच्यावर रागावू शकलो नाही........हो फक्त तीच एक हास्य......तुम्हला मी वेडा तर वाटत नाही ना......पण खर सांगू हो आहेच मी वेडा.........पण फक्त तिच्या प्रेमात वेडा.....
तिची आठवण आली ना कि माझ्या मनात तिच्या सगळ्या आठवणीची एकच गर्दळ होते......
तिच्या बद्दल मी कितीही सांगितलं तरीही ते माझ्यासाठी अपूरच आहे....... कारण माझ्या जगात फक्त ती आहे......आणि सगळीकडे फक्त ती आणी तीच....

माझ्या स्वप्नात ती,
माझ्या मनात ती,
माझ्या आयुष्यातला एक पर्व ती......
जगासाठी निराधार मी...पण माझ्या आयुष्याचा आधार ती......

ती दुसरी तिसरी कोणी नसून माझ्या मनातली साजणी आहे.......................