खरच देव दगडा मध्ये आहे का ?
असा प्रश्न कधी तुम्हाला पडला आहे……पण मला पडला आहे
अंधश्रध्ये पायी, बरेच भाबडे लोक बळी जाऊ लागले आहेत
आजही आपल्या खेड्या पाड्या मध्ये भोंदू बाबांच्या आहारी जाऊन लोक, आपल्या जिवलग लोकांचा जीव गमवतात.....
पण हे दृश्य आता खेड्या-पाड्या मध्येच नाही तर शहरा मध्ये पण दिसू लागल आहे……..आजकाल सुशिक्षित लोक सुद्धा अंधश्रध्येचे बळी पडत चालले आहेत
बरेच लोक दर सोमवारी शंकराच्या मंदिरात जाऊन १ लिटर दुध चढवतात याच आशेने कि देव आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल
पण तुम्ही हे का विसरता अख्ख्या भारता मध्ये दर दिवशी हजारो मुल उपाशी पोटी झोपतात आणि तुम्ही हजारो लिटर दुध देवाला वाहता.......माझी देवावर श्रद्धा नाही अस मी म्हणतच नाही पण त्याच एक लिटर दुधामधल अर्धा लिटर दुध जरी एका गरीब मुलाला दिल तर त्या दिवशी आपल्या मुळे एक मुलगा तरी उपाशी झोपला नाही ह्या गोष्टीने मनाला भेटणारी शांती हि देवाला चढवलेल्या एका लिटर दुधापेक्षा जास्त असेल हे नक्की….! आणि देव काही म्हणत नाही मला १ लिटरच दुध हव आहे त्याशिवाय मी तुझ्या इच्छा पूर्ण करणार नाही हे सगळे आपले मनाचे खेळ.
“ हे सर्व आपल्या श्रद्धे वर अवलंबून आहे कि आपण काय मानायचं आणि काय नाही "
जर तुम्ही अभ्यास केलाच नाहीत तर तुम्ही देवाला फक्त दुध चढवून पास होणार आहात का ? नाही ना
तसच श्रद्धे बरोबर मेहनतीची पण गरज आहे तरच देव सुद्धा तुम्हाला मदत करेल देवावर श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नको......
असाच अजून एक मला आलेला अनुभव…….
मी ज्या रस्त्याने घरी जातो तिथे बरेच लोक सकाळी जॉगिंग करून झाल कि १० रुपयाची पारले-जी ची बिस्किटे कुत्र्यांना देतात पण त्याच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेली चार पाच लहान मुल या आशेने बघत असतात कि आता तरी हे लोक आम्हाला दोन बिस्किटे देतील पण हे कधीच होत नाही
का त्या लोकांना त्या मुलांच्या चेहऱ्या वरील भूक दिसून येत नाही का ?
कि त्या गरीब मुलापेक्षा ती कुत्री त्यांना जवळची वाटतात का ?
का त्यांना माणूस आणि जनावरा मधला फरक दिसून येत नाही
मला कोणाला काहीही शिकवणूक द्यायची नाही पण एक माणूस म्हणून माणसाची किंमत करायला नको
गरीब असला म्हणून काय झाल त्याला पण भूक लागते , उपाशी राहिल्यावर त्याला पण झोप लागत नाही
दगडाला तर देव आपण बनवला पण देवाने तर तर माणसातच एक देव लपवला आहे हे आपण विसरलो
विचारा त्या गरीब मुलाला त्याच्यासाठी जो त्याची भूक शमवतो तोच त्याचा देव,
विचारा त्या शिष्याला त्याला जो विद्या शिकवतो, तो गुरु त्याचा देव
सगळ्या रुपात देव माणसा मध्येच लपला आहे........कुठल्याही दगडच्या मूर्ती मध्ये नव्हे
म्हणून देवाला माणसा मध्ये शोधा दगडात नव्हे……….
No comments:
Post a Comment